Thursday, March 12, 2026

ST Mahamandal Recruitment: एसटी महामंडळात १८ हजार पदांसाठी बंपर भरती

एसटी महामंडळात नोकरीची संधी

१७ हजार ७४२ पदांसाठी भरती जाहीर

परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

महाराष्ट्र शासनात सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात लवकरच मेगाभरती होणार आहे. एसटी महामंडळात १७ हजार ७४२ पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी माहिती दिली आहे.

एसटी महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी दरवर्षी ५ हजार नवीन बस खरेदी करणार आहे. या नवीन बस सेवेसाठी मनुष्यबळ लागणार आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी नवीन कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महामंडळामध्ये बस वाढणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांची संख्यादेखील वाढवावी लागणार आहे. यासाठी १७ हजार ७४२ पदांची भरती जाहीर केली आहे. यामुळे राज्यातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.परिवहन विभागाची ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. या भरतीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. यामध्ये २०२२ मध्ये झालेल्या संपादरम्यान एसटी सुरु ठेवण्यासाठी ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम केले त्यांना या भरतीत प्रधान्य दिले जाणार आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतदेखील सामावून घेतले जाऊ शकते.

महामंडळाच्या एसटी बसमध्ये वाढ होत आहे. सध्या एसटी महामंडळाकडे १४,००० बस आहेत. त्यात ५००० बस वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे वाढत्या बसेससाठी चालक, वाहन, फिटर अशा अनेक तांत्रिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. यासाठी भरती करण्याचे संकेत सरकारने दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles