Friday, March 13, 2026

बॉलिवूड अभिनेत्रीलाही ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ची भुरळ… भन्नाट व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘ हा लोकप्रिय कार्यक्रम असून हा कार्यक्रमाचा चाहतावर्गही खूप मोठा आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीलाही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची भुरळ पडली आहे. अभिनेत्रीनं हास्यजत्रेच्या प्रहसनावर एक रील शेअर केली आहे. शमिताची ही रील सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

शमितानं पृथ्वीक प्रतापच्या स्कीटवर रील बनवली आहे. उत्तम लिप्सिंग करत शमितानं अभिनय केला आहे. या व्हिडिओवर पृथ्वीक प्रतापने कमेंट करत, ‘थँक यू शमिता जी’ अशी कमेंट केली आहे. मराठी भाषेत अभिनेत्रीचं रील पाहून चाहत्यांना धक्का बसलाय. शमिताच्या या रीलवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं की, ‘व्वा, तू मराठीत रील बनवलं हे आश्चर्यकारक आहे. छान. आणखी काही रील बनवण्याचा प्रयत्न कर. शुभेच्छा’ तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, ‘वाह शमिता वाह… जमलं तुला’

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles