जगभरात ऊर्जा संकट ओढावले आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅसचा पुरवठा संतुलित आणि नियमित ठेवण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. आता ग्राहक त्यांच्या मनाप्रमाणे केव्हा पण सिलेंडर बुक करू शकणार नाहीत. गॅस वितरण कंपन्यांनी (IOCL, BPCL, HPCL) रिफलिंगसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. अफवा आणि पॅनिक बुकिंग थांबवण्यासाठी सरकारने नियमावली आणली आहे. त्यानुसार बुकिंगचा कालावधी वाढला आहे.
काय आहे नियम?
नवीन नियमानुसार, आता दोन सिलेंडरच्या दरम्यान एक निर्धारीत कालावधी असेल. यापूर्वी ग्राहकांना महिनाभरात सहज गॅस सिलेंडर बुक करता येत होते. आता सामान्य नागरिकांसाठी ही कालमर्यादा 15 ते 21 दिवस इतकी निश्चित करण्यात आली आहे. एकदा सिलेंडर मिळाल्यावर पुढील 15 ते 21 दिवसांपर्यंत दुसरे सिलेंडर बुक करता येणार नाही. वितरण विस्कळीत झाले असले तरी कमीत कमी एक सिलेंडर ग्राहकांना मिळावे असा सरकारचा प्रयत्न आहे.
बुकिंग करता येणार नाही
जिथे पुरवठा अधिक आहे, तिथे ही मर्यादा 25 ते 45 दिवसांपर्यंत आहे. यामुळे एकाचवेळी एकच माणूस अधिक सिलेंडर बुक करून घरी घेऊन जाऊ शकत नाही. तर गरजवंतांना गॅस टंचाईचा सामना करावा लागणार नाही, त्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. जर तुम्ही या कालावधीत पुन्हा सिलेंडर बुकिंग करण्याचा प्रयत्न केला तर ती विनंती नामंजूर होते अथवा त्यावर काहीच उत्तर मिळत नाही.
या लोकांना 45 दिवसात सिलेंडर
ग्रामीण भागात (Rural Areas) जिथे पुरवठा होण्यास वेळ लागतो. तिथे बुकिंगचा कालावधी 45 दिवस इतकी ठेवण्यात आली आहे. तर शहरी भागात जिथे गॅस एजन्सी अगदी जवळ असते, तिथे हा कालावधी 21 दिवसांचा ठेवण्यात आला आहे. ज्या कुटुंबाकडे ‘सिंगल सिलेंडर’ कनेक्शन आहे. त्यांना ‘डबल सिलेंडर’ (DBC) असणाऱ्यांपेक्षा बुकिंगमध्ये प्राधान्य देण्याकडे कल आहे. त्यामुळे तुम्ही गॅस सिलेंडर बुकिंग करून किती दिवस झाले हे अगोदर तापासा. सरकार करत असलेल्या प्रयत्नामुळे लवकरच सिलेंडर तुटवड्याची समस्या सुटणार आहे.


