Saturday, March 14, 2026

या पोरींपुढे माधुरी दिक्षीतही फिकी पडेल! तरुणींचा डान्स सोशल मीडियावर होतोय व्हायरल

सोशल मीडियावर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, सध्या तरुणींचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील त्यांच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. काही लोक तर सार्वजनिक ठिकाणीही बिनधास्त डान्स करुन त्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.असाच या तरुणींचाही डान्स सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सोशल मीडिया हे लोकांसाठी आपल्या कला सादर करण्याचे एक अनोखे माध्यम बनले आहे. कोणी डान्स, तर कोणी स्टंट, तर कोणी चित्रकलेच्या माध्यमातून आपले कौशल्य जगासमार मांडतात. गेल्या काही दिवसांपासून काही तरुणींचा डान्स हा नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. काय ती अदा, काय तो नखरा, काय ते डान्स स्टेप्स या तरुणींचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकदा पाहून पण नेटकऱ्यांचं मन भरतं नाही आहे. ते हा व्हिडीओ वारंवार पाहतं आहेत. आतापर्यंत या व्हिडीओ हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून प्रत्येका तोंडून एकच वाक्य निघतंय क्या बात है.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एकूण २ तरुणी भन्नाट डान्स करत आहेत. “हमको आज कल है इंतज़ार कोई आये लेके प्यार हमको आज कल है इंतज़ार कोई आये लेके प्यार” गाण्यावर या तरुणींनी जबरदस्त असा डान्स केला आहे. ज्यामधील तिच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. डान्स व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचा डान्स आणि एकेक अदा इतक्या सुंदर आहेत की पाहणाऱ्याला आपोआप भुरळ पडते. त्यांच्या या अदांवर नेटकऱ्यांनीही चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरुणीच्या डान्स प्रमाणेच त्यांच्या लूकनेही पाहणाऱ्यांना चांगलेच वेड लावले आहे.


हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील _jui_palsamkar__200 या अकाउंटवर शेअर केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles