Saturday, March 14, 2026

राज्यात 30 हजार शिक्षकेतर पदांची भरती होणार ; पदभरतीसाठीचे नवीन निकष

शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आता ठोस पावले उचलली आहेत. यासाठी नवीन पात्रता निकष आणि अटी जाहीर करण्यात आल्या असून, या प्रक्रियेला ‘महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, २०२६’ असे नाव देण्यात आले आहे. या नव्या नियमांच्या आधारावरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. यामुळे तब्बल २१ वर्षांनंतर शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला पुन्हा गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये २००५ नंतर शिक्षकेतर पदांची भरती झालेली नाही. या बंदीला आव्हान देण्यासाठी विविध संघटनांनी दीर्घकाळ लढा दिला. २०१९ मध्ये सुधारित आकृतीबंध जाहीर करून या मागणीस काही प्रमाणात आधार मिळाला, परंतु त्यानंतर शासनाने पुढील कारवाई थांबवली आणि स्थिती जशीच्या तशी राहिली.

आता २०२६ मध्ये शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी नवीन निकष आणि पात्रता निश्चित करणारे ‘महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, २०२६’ तयार केले आहेत. या नव्या नियमांच्या आधारे भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, त्यामुळे तब्बल २१ वर्षांनंतर शिक्षकेतर पदांच्या भरतीला गती मिळणार आहे.

राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये नव्या निकषांनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे निर्माण होणार आहेत. यानुसार, कनिष्ठ लिपिक पदे १७,६९५, वरिष्ठ लिपिक पदे ४,९१२, मुख्य लिपिक पदे ९२३ इतकी असतील. तसेच ग्रंथपाल पदे २,११८, नववी-दहावी साठी प्रयोगशाळा सहायक पदे ४,६८५ आणि उच्च माध्यमिक साठी प्रयोगशाळा सहायक पदे २,०४० अशी एकूण रचना प्रस्तावित आहे. या शासन निर्णयामुळे रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्याची संधी उपलब्ध होणार असून, तब्बल २१ वर्षांनंतर ही प्रक्रिया वेगाने राबवली जाणार आहे.

‘महाराष्ट्रतील खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, २०२६’ अंतर्गत जाहीर करण्यात आले आहेत. यानुसार शिक्षकेतर पदांसाठी पात्रता आणि नियुक्ती प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे.

कनिष्ठ लिपिक पदासाठी: कोणत्याही शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने समतुल्य घोषित केलेली इतर अर्हता आवश्यक आहे. तसेच, शासन मान्यताप्राप्त प्राधिकाऱ्याकडून मिळालेले प्रमाणपत्र असावे, ज्यात मराठी टंकलेखनाची गती प्रतिमिनिट ३० शब्द किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती प्रतिमिनिट ४० शब्द असावी.

वरिष्ठ लिपिक पदासाठी: नियमित वेतनश्रेणीसह कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या आणि त्या पदावर कमीत कमी ३ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांमधून ज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर पदोन्नतीद्वारे नियुक्ती केली जाईल. प्रमुख लिपिक (मुख्य लिपिक) पदासाठी: वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या आणि त्या पदावर कमीत कमी ३ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांमधून ज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर पदोन्नतीद्वारे भरती होईल.

ग्रंथपाल पदासाठी: सांविधिक विद्यापीठाची ग्रंथालय विज्ञान विषयातील पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून ग्रंथालय विज्ञान विषयाची पदविका, तसेच कोणत्याही शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहायक पदासाठी: मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाकडून इयत्ता १२ वी (विज्ञान शाखा) उत्तीर्ण असावे. तर शिपाई (सेवक) पदासाठी: मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाकडून किमान १२ वी उत्तीर्ण असावे. या पदांसाठी अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरणानुसार विभागाकडून राबवली जाईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles