onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक 14-03–2026 एकुण कांदा गोणी -59,069
लाल कांदा बाजार भाव
1 नंबर= 1150 ते 1450
2 नंबर= 800 ते 1150
3 नंबर= 400 ते 800
4 नंबर= 150 ते 400
अपघातात महिलेचा मृत्यू; मुलगा जखमी
अहिल्यानगर ः नगर-पुणे महामार्गावर चास शिवारात भरधाव वेगाने जाणार्या एका अज्ञात कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, त्यांचे नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अमोल रावसाहेब रासकर यांची आई आणि चुलत मामा दत्तात्रय आगरकर हे आपल्या दुचाकीवरून चास येथून अहिल्यानगरच्या दिशेने जात होते. यावेळी हेमराज फार्म्ससमोर पाठीमागून येणार्या महिंद्रा एसयुव्ही ४०० कारच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अविचाराने आणि हयगयीने चालवून दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत फिर्यादीच्या आईचा जागीच मृत्यू झाला, तर मामा गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी किंवा दवाखान्यात नेण्याऐवजी आरोपी चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार जायभाय हे करीत आहेत.


