Sunday, March 15, 2026

गॅस सिलिंडरनंतर पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढणार, सरकारकडून आले स्पष्टीकरण, वाचा…..

घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या आठवड्यात मोठी वाढ करण्यात आली होती. त्यातच आखाती देशातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या अन् इंधनाचा तुटवडा सुरू झाला, त्यामुळे देशात खळबळ उडाली. एलपीजी घेण्यासाठी एजन्सीबाहेर भल्यामोठ्या रांगा लागल्या. त्याशिवाय पेट्रोलच्या किंमती वाढणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर झळकले अन् देशात पुन्हा एकदा महागाईची चर्चा सुरू झाली. पण खरेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होणार का? केंद्र सरकारकडून या प्रश्नांचं उत्तर देण्यात आले आहे. वाचा केंद्र सरकारकडून नेमकं काय स्पष्टीकरण देण्यात आले.

आखाती देशातील युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मागील १५ दिवसात आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत ४० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. भारताच्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये तेलाच्या किंमतीचा स्फोट झाला. त्यामुळे आता आपल्याकडे किंमती वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली. पण सरकारकडून तेलाच्या दरात कोणतीही वाढ होणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही वाढणार नसल्याचे आश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. Ministry of Petroleum and Natural Gas कडून एक्सवर अधिकृत पोस्ट करत किंमती स्थिर राहणार असल्याचे सांगितेलय. देशात पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही कमतरता नाही. सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांनी देखील इंधनाची कमतरता नसल्याचे सांगितले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,’ देशभरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. लोकांनी घाबरू नये. त्याशिवाय पेट्रोल आणि डिझेलचा असुरक्षित साठा करू नये. कारण यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते.’ किरकोळ दुकानांना इंधन पुरवठा करताना सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. कोणतेही उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही केंद्राने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पेट्रोल-डिझेलचा देशात मोठ्या प्रमाणात साठा आहे, त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. गरज नसताना पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी खरेदी न करण्याचे आवाहन सरकारकडून कऱण्यात आले आहे. दरम्यान, तेल विपणन कंपन्यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, देशातील जवळपास १ लाख किरकोळ दुकानांमध्ये कुठेही इंधनाचा तुटवडा जाणवलेला नाही. देशात इंधन आणि गॅस पुरवठा सामान्यपणे सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles