Sunday, March 15, 2026

बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब, राहुरीत प्राजक्त तनपुुरे राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक….

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुदूचेरी या ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली. या निवडणुकीसोबत महाराष्ट्रातील विधानसभेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली. बारामती आणि राहुरी येथील निवडणुकांची घोषणा होताच राष्ट्रवादीनं उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.बारामतीमधून सुनेत्रा पवार याच निवडणूक लढवतील, असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुमित्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची आज जिजाई बंगल्यामध्ये चर्चा झाली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांशी बोलणार असल्याचेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही पोटनिवडणुकीबाबत बोलताना सुनेत्रा पवारच राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार असल्याची माहिती दिली होती. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार दिला जाणार नसल्याचे सांगितलं जात आहे.
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष बारामती पोटनिवडणूक लढणार नसल्याचं म्हटलं जातंय. पक्षांतर्गत बैठकीत निवडणूक न लढण्याचा निर्णय झाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती दिलीय. दरम्यान मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्यात विरोधात युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा निवडणूक लढली होती. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार न देण्याची भूमिका शरद पवार गटाची आहे.

भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं 17 ऑक्टोबर 2025 ला निधन झाल्यानं ती जागा रिक्त होती. या जागेवर महाविकास आघाडी राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष या ठिकाणी उमेदवार देण्याची शक्यता आहे. माजी आमदार प्राजक्त तनपुरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles