Monday, March 16, 2026

पारनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कीर्तनकार यशवंत थोरात अटकेत

पारनेर तालुक्यातील ढवळीपूर गावात वारकरी संप्रदायाच्या लौकिकाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका कीर्तनकाराने अल्पवयीन मुलीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर आली.

श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) (वय 38) याने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीला गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे

पोलिसांनी थोरातविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आणि तत्काळ आरोपीला रविवारी पहाटे ढवळपुरी येथील घरातून अटक केली. न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत (शुक्रवार) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रणजीत मारग तपास करीत आहेत. दरम्यान, या भोंदू महाराजावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles