Monday, March 16, 2026

बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक…. खा.सुप्रिया सुळे यांचे मोठे वक्तव्य…

Baramati By Election 2026  उपमुख्यमंत्री अजित पवार   यांच्या निधनानं रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक  जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती आणि राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

बारामतीची पोटनिवडणूक जाहीर होताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवार असतील, अशी भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली.

याचदरम्यान, आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती पोटनिवडणूकीबाबत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी सुप्रिया सुळेंना बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत प्रश्न विचारला. यावर आम्ही बारामतीची जागा लढणार नाही, विषयच येत नाही. मी याआधी देखील सांगितलं आहे. सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही. महाविकास आघाडीचीही बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याची भूमिका नाही, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.

निवडणुकीची अधिसूचना जारी :  30 मार्च 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026
मतमोजणी : 4 मे 2026

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles