Monday, March 16, 2026

रोहित शर्माने स्वत:ची नक्कल पाहून दिली अशी प्रतिक्रिया…Video

रताला सलग दोन आयसीसीची जेतेपद पटकावून देणाऱ्या कर्णधार रोहित शर्माचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. रोहित टी-२० मुंबई लीग स्पर्धेच्या लाँच सोहळ्यासाठी उपस्थित होता. हिटमॅन टी-२० मुंबई लीग स्पर्धेचा ब्रँड अम्बेसेडरदेखील आहे. या स्पर्धेपूर्वीच्या कार्यक्रमादरम्यानचा रोहितचा हा व्हीडिओ आहे.

टी-२० विश्वचषक २०२६ नंतर हिटमॅन कुटुंबासह सहलीला गेला होता. मालदीवमधील सहलीचे फोटो, व्हीडिओ रोहितने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सहलीवरून परतल्यानंतर रोहित शर्मा टी-२० मुंबई लीगच्या लाँचसाठी पोहोचला होता. रोहित शर्मासह यावेळेला महिला क्रिकेटपटू सायली सतघरेदेखील उपस्थित होती.

रोहित शर्मा, सायली सतघरे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि इतर मंडळींनी स्पर्धेची ट्रॉफी रिव्हिल केली. मुंबई टी-२० लीगचं हे चौथं वर्ष असणार आहे. आयपीएल व भारतासाठी अनेक नवे चेहरे समोर आणण्याचं काम ही स्पर्धा करत आहे. या कार्यक्रमादरम्यान रोहित शर्मा समोर उपस्थित होता.

प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट शारंग श्रृंगारपुरे यांनी रोहित शर्मासमोर त्याची नक्कल केली. शारंग यांनी रोहित शर्माची नक्कल करण्यासाठी त्याचं नाव घेताच रोहितने लगेच त्याच्यादिशेने हात वर केला आणि हसायला लागला. यानंतर रोहित शर्माचे काही फेमस वाक्य म्हणत त्यांची नक्कल केली. रोहित संपूर्ण नक्कल होईपर्यंत हसताना दिसत होता. यानंतर त्याने नक्कल पूर्ण केल्यानंतरही रोहित खळखळून हसत टाळ्या वाजवत त्याचं कौतुक केलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles