शेवगाव नगरपरिषदेचे नगरसेवक रिझवान शेख यांचे नगरसेवक पद रद्द

शेवगाव-जातपडताळणी प्रमाणपत्र अवैध झाल्याने शेवगाव नगरपरिषदेचे नगरसेवक शेख रिझवान छोटूभाई यांचे नगसेवक पद रद्द केल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काढले आहेत. त्यांना सहा वर्ष निवडणुक लढविण्यास अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

सन 2024 मध्ये पार पडलेल्या शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रं.3 मधून नागरीकांचा मागास प्रवर्ग राखीव जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रिझवान शेख हे नगसेवक पदासाठी निवडून आले होते. त्यानंतर या प्रभागामधील पराभूत उमेदवार प्रताप मुकुंदराव फडके यांनी शेख या जातीमध्ये येत नसल्याची हरकत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती. सदर समितीच्या पडताळणी दरम्यान शेख यांचे नातेसंबंध व पुरावे सिद्ध होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांचे नागरिकांचा मागास प्रवर्ग जातप्रमाणपत्र अवैध धरूण रद्द करण्यात आले.

त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रमाणपत्र रद्द झाल्याने रिझवान शेख यांचे नगसेवक पद रद्द केले. प्रभाग क्रं.3 मधील जागा रिक्त असल्याचे घोषित केले. तसेच शेख यांनी खोटे प्रमाणपत्र दिल्याने त्यांना सहा वर्ष कालावधीसाठी निवडणुक लढविण्यास अपात्र करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या सुनावणी वेळी प्रताप फडके यांच्या वतीने ॲड. अभिजीत काकडे यांनी युक्तीवाद केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles