Monday, March 16, 2026

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना , इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीतून 15 वर्षीय मुलीवर दोघांचा अत्याचार

अहिल्यानगर- इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीतून संशयितांनी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकावून तिला चेहेडीजवळ दारणा नदीकाठावरील जंगलात नेऊन अत्याचार केला. त्यानंतर तिला नाशिकरोड बसस्थानकावर सोडून पोबारा केल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली. नाशिकरोड पोलिसांच्या पथकाने मोबाइलचे लोकेशन शोधून राहुरी तालुक्यातील वांबोरी येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.सुरज उर्फ परशा जाधव (रा. वांबोरी,ता. राहूरी, जि.आहिल्यानगर) आणि जयसिंग रमेश वाघ (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, अहिल्यानगर) अशी संशयितांची नावे आहेत. नाशिकरोड न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेतील पीडित मुलगी नाशिकरोड येथे एका हायस्कूलमध्ये नववीत शिक्षण घेते. घटनेच्या दिवशी ती तिच्या वडिलांसोबत घरी होती.

मात्र दुकानातून सामान आणायचे असे सांगून सकाळी 10 वा. गेली होती. ती लवकर परत आली नाही. अखेर मुलीनेच फोन करून दुपारी अडीच वाजता नाशिकरोड बस स्थानकावर आईला बोलावले. बस स्थानकावर ती खूप घाबरलेली होती. घटनेबाबत तीने वाच्यता केली नाही दोन दिवसांनी पीडितेने तिच्या भावाला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या घटनेबद्दल कळताच कुटुंब घाबरले.इन्स्टाग्रामवर दोन महिन्यांपूर्वी ओळख झालेला संशयित सुरज उर्फ परशा जाधव याने मुलीला फोन करून नाशिक रोड बसस्थानकावर भेटायला बोलावले. आली नाही तर जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. घाबरलेली मुलगी त्याला भेटायला गेली. तेथे सुरज सोबत दुसरा संशयित जयसिंग वाघ दुचाकीवर आला होता. या दोघांनी दारणाच्या काठावर अत्याचार केला. त्यांनी मोबाइलमध्ये मुलीचे फोटो, व्हिडीओही काढल्याचे सांगितले जाते.

याप्रकरणी तरुणीच्या नातेवाइकांनी पोलिस ठाणे गाठले. फिर्यादीनंतर नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या मोबाइलच्या तांत्रिक विलेषणाच्या आधारे लोकेशन शोधून दोघांना वांबोरी गावातून अटक केली. दोन्ही संशयित मजुरी करतात. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेला मोबाईल, दुचाकी पोलिसांनी जप्त केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles