Monday, March 16, 2026

शेतकऱ्यांना दिलासा ;उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना

शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून सीना मध्यम प्रकल्पातून दि.१६ मार्च २०२६पासून उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मे २०२५ मध्ये अवकाळी पावसामुळे सीना नदीची उपनदी असलेल्या वाळूंबा नदीस आलेल्या पुरामुळे सीना मध्यम प्रकल्प जून २०२५मध्ये पूर्ण क्षमतेने भरला होता.सप्टेंबर २०२५मध्ये झालेल्या अतिवृष्टीने रब्बी हंगामात पाण्याची मागणी झाली नाही.मात्र मार्च २०२६ मध्ये उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने सीना मध्यम प्रकल्पाच्या माही जळगाव भागातून उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांना भेटून केली होती.

सीना मध्यम प्रकल्पा मध्ये उपलब्ध असलेला पाणी साठा विचारात घेवून १६मार्च २०२६पासून आवर्तन सोडण्याच्या सूचना कुकडी सिंचन प्रकल्पाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती अलका अहीरराव कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांना देण्यात आल्या आहेत.

रब्बी आवर्तनाचा कालावधी आताच संपला असतांना केवळ शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला असला तरी भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेवून आवर्तन कालावधीत पाण्याचा अपव्यय कुठेही होणार नाही याची दक्षता अधिकार्यांनी घेण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.

अलनिनोच्या संदर्भात हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील धरणामध्ये असलेल्या पाणी साठा जपून वापरावा लागणार असल्याचा विचार करून अधिकार्यांनी सर्वच धरणा मधील पाण्याबाबत संवेदनशीलतेने दक्षता घेण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles