Tuesday, March 17, 2026

विधानसभेत जितेंद्र आव्हाड यांचे छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य.. गदारोळानंतर मागितली माफी

राज्य सरकारने आणलेल्या ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026’ वर सोमवारी विधानसभेत सखोल चर्चा झाली. या विधेयकात नेमक्या काय-काय तरतुदी आहेत, याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. विधेयकात सक्तीच्या धर्मांतराविरोधात काय शिक्षा असेल, याबाबतही त्यांनी सभागृहाला सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयकावर बोलत होते. या विधेयकावर ते बोलत असताना इतिहासातील विविध दाखले देत होते. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकासंदर्भातील एक दाखला देण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन सभागृहात वाद निर्माण झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलगिरी व्यक्त करण्याचे निर्देश दिले, यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाची माफी मागितली.

जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या उल्लेखांचा विरोध करण्यात आला. मंत्री शंभूराज देसाई यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाबाबत आव्हाड यांनी केलेले दावे आम्ही पहिल्यांदाच ऐकतो आहोत, असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे वक्तव्य करण्यात आले ते पटलावरून काढून टाकावे, अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. तसेच पुढे सत्ताधारी आमदारांनी आव्हाड यांनी माफी मागावी त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली. ़विरोध वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार आव्हाड यांनी माफी मागितली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles