बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दोन्ही ठिकाणच्या सदस्यांचे अकाली निधन झाल्याने येथे निवडणूक जाहीर झाली असून 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यापूर्वी राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. .बारामती मतदारसंघात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट पवार कुटुंबीयांवर टीका करत येथील निवडणूक बिनविरोध करण्यास विरोध दर्शवला आहे. सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावं असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं आहे. आम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो असे हाके यानी म्हटलं आहे.
सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावं, इथं पवार सोडून विधानसभाला उमेदवार द्यावा असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले आहे. आम्ही निवडणूक लढवतो पण काही जणांच्या पोटात दुखते. सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर पाठवा, आम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो असे हाके यांनी म्हटलं आहे. सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधानपरिषदेवर पाठवा. इथं अजित पवार यांच्या घरातील सोडून दुसरा उमेदवार उभा करा असेही हाके म्हणाले. राज्य शासनाच्या अनेक धोरणांच्या विरोधात आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत. शरद पवार यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवलं आहेच. मग सुनेत्रा पवार यांना देखील विधानपरिषदेवर बिनविरोध पाठवा असेही हाके म्हणाले. मी उमेदवार असेन असं नाही, येथील लोकलचा उमेदवार देखील निवडणूक लढवू शकतो असे हाके म्हणाले.
28 जानेवारीला विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर होणारी बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा सुरु असतानाच आता ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केल्याचं दिसत आहे. आपण निवडणूक लढवावी यासाठी बारामतीतील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह असल्याचं ते म्हणाले. तसेच दादांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी शपथविधी होतो, मग आम्हीच त्यांच्या निधनाचं दुःख का व्यक्त करायचं, असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं होतं.


