Thursday, March 19, 2026

पाथर्डीत लॉजवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसाय प्रकरणी एक अटक, मुख्य आरोपी फरार

पाथर्डी: तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी फाट्यावर अक्षय लॉजवरील वेश्या व्यवसायावर पाथर्डी पोलिसांनी मंगळवारी (दि.17) मध्यरात्री छापा टाकत चार महिलांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीराम राधाकिसन फुंदे (रा. फुंदे टाकळी) हा अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला असून, व्यवस्थापक दीपक पोपट बटुळे (रा. भारजवाडी) याला पोलिसांनी अटक केली.पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप ढाकणे व पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोन वाहनांतून घटनास्थळी जाऊन सापळा रचला. पोलिस कर्मचारी संजय जाधव यांना बनावट ग्राहक म्हणून एक हजार रुपये देऊन संबंधित ठिकाणी पाठविण्यात आले.

व्यवस्थापकाने पैसे स्वीकारून एका महिलेला जाधव यांच्यासोबत खोलीत पाठविल्यानंतर संपूर्ण प्रकाराची खात्री पटली. यानंतर जाधव यांनी वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर पोलिस पथकाने तत्काळ ठिकाणाला वेढा घालत छापा टाकला.

या कारवाईदरम्यान चार महिलांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, मुख्य आरोपी श्रीराम फुंदे निसटण्यात यशस्वी झाला. महिला पोलीस कर्मचारी उत्कर्षा वडते यांच्या फिर्यादीवरून श्रीराम फुंदे व दीपक बटुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी याच ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून सुमारे 20 महिलांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर काही काळ बंद असलेला हा व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles