Thursday, March 19, 2026

Gold Price:मोठी खुशखबर! गुढी पाडव्याला सोन्याचा भाव प्रचंड घसरला,जाणून घ्या १० ग्रॅमचा भाव

गुढी पाडव्याच्या आनंदात आणखी एक खुशखबर लोकांना मिळाली आहे. मराठी नववर्षाची सुरूवातीलाच सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. आज सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा २७८० रूपयांची घसरण नोंदवण्यात आली. महाराष्ट्रात पाडव्याला अनेकजण सोन्याची खरेदी करतात, त्या सर्वांना हा आनंदाचा धक्का मानला जातोय. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठा बदल झाला आहे. आखाती देशात युद्धाचा वणवा पेटला असतानाच सोन्याचे दर घसरले आहेत. मुंबई, पुणे, जळगावपासून दिल्ली आणि चेन्नईमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. भारतीय बाजारात सोन्याचे दर किती आहेत, याबाबत जाणून घेऊयात.

२४-कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्ये बुधवारच्या तुलनेत मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे दर आज १५७,५७० प्रति १० ग्रॅमवरून घसरून ₹१,५४,७९० वर आले आहेत. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव आज प्रति तोळा ₹१४१,९०० इतका आहे. बुधवारी हेच सोनं ₹१४४,४५० इतकं होतं. १८-कॅरेट सोन्याचा भावही घसरला आहे. आज सराफा बाजारात १८-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹११६,१३० आहे, जो बुधवारी ₹११८,२२० इतका होता.

२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ₹१,५४,७९०

२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,४१,९०० आहे.

तेलाच्या किमती वाढल्यानंतर महागाईचा धोकाही वाढतो. सोने आणि चांदी सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे गुंतवणूक त्यात मोठ्या प्रमाणात वाढते. पण सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती घसरत आहेत. अमेरिकेच्या धोरणांकडेच फक्त आंतरराष्ट्रीय बाजाराचे लक्ष नाही, तर आखाती देशातील तणावाकडेही गुंतवणूकदाराचे बारकाईने लक्ष आहे. अमेरिका-इस्त्राईल आणि इणराण यांच्यातील बिघडत चाललेली परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. पण याचा सोन्याच्या मार्केटवर गंभीर परिणाम पडलेला दिसत नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles