भोंदू तांत्रीक कॅप्टन अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणात राज्य शासनाने विशेष महिला तपास अधिकारी नियुक्त केला आहे. हे अधिकारी नाशिक शहरात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अशोक खरात याच्या संपत्ती विषयी नवा खुलासा पुढे आला आहे. आता या प्रकरणात अहिल्यानगरचे भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी या संदर्भात धक्कादायक दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासातून काय पुढे येते याची उत्सुकता वाढत आहे.
अशोक खरात यांनी विविध राजकीय नेत्यांच्या संपर्कात राहून संपत्ती जमा केल्याचा आरोप होत आहे. याबाबत नाशिक पोलिसांनी काही माहिती दिली आहे. या माहितीत संपत्तीचे मूल्य ऐकून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.
या संदर्भात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आपण अशोक खरात या व्यक्तीला कधीही भेटलेलो नाही. त्याच्याशी संपर्क करण्याचाही प्रयत्न केला नाही. असे विधान करून या प्रकरणापासून अलिप्त असल्याचे स्पष्ट केले.
कॅप्टन खरात हा शिर्डी लगतच्या मिरगाव (सिन्नर) येथील आहे. त्यामुळे त्याने बरीच संपत्ती शिर्डी येथे जमा केल्याचे बोलले जाते. त्यावर माझी खासदार विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, फक्त शिर्डी नव्हे तर अनेक ठिकाणी त्याच्या मालमत्ता असल्याची माहिती माझ्याकडे आहे. शिर्डी सोबतच राहाता, साकुरी आणि अन्य गावांमध्येही त्याने मालमत्ता खरेदी केल्याचे मला कळले आहे. यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यातून त्याचे विवरण स्पष्ट होईल.
या प्रकरणात अनेकांची नावे पुढे येत आहेत. यामध्ये सबंध महाराष्ट्रात जाळे पसरले आहे. कंची नावे अद्याप पुढे आलेली नाही. शासनाने हा तपास सीआयडी आणि एसआयटी कडे दिला आहे. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे होतील असा दावा त्यांनी केला.


