Gold- Price:सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घेऊया १० ग्रॅम सोन्याचा भाव

मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू असल्याचं दिसत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे. यामुळे सणासुदीच्या काळात आणि लग्नसराईत नागरिकांना स्वस्तात दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली. या घसरणीमुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर दुसरीकडे गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) माहितीनुसार, शुक्रवार सकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४७,८८९ रुपये होता. जो दुपारपर्यंत प्रति १० ग्रॅम १,४७,३४० रुपयांवर पोहोचला. सायंकाळच्या बाजार बंद होईपर्यंत, सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४७,२१८ वर पोहोचला होता

सोने आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार २४ कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर १५१६३७ रुपये इतका आहे. आजच्या दिवशी सोन्याच्या दरात ३२४२ रुपयांची घसरण झाली आहे. काल सोन्याचा दर १५४८७९ रुपये प्रति तोळा होता. २२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचा पाहायला मिळालं. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या दरात ३२२९ रुपयांची घसरण झाली असून याचा दर १५४२५९ रुपयांवरुन १५१०३० रुपयांवर आला आहे.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २१ मार्च २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १४,७२१८ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. गुरुवार आणि शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्यावर आता शनिवारी सुद्धा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर शनिवारी (२१ मार्च) सकाळी चांदीच्या दरात घसरण झाली आणि हा दर २,३२,३६४ रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे.उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles