Video: अशोक खरात व्हिडिओ प्रकरणावरुन संताप, छोटा पुढारी रुपाली चाकणकरांना थेट म्हणाला..

संपूर्ण राज्यात अत्याचारी बाबाच्या कारानाम्याने थैमान घातला आहे. महिलांच्या श्रद्धेच्या छायेखाली त्याने काळे कृत्य केले आहे. त्याचे एक-एक कारनामे उघडकीस आल्यानंतर राज्यात आणि त्याच्या भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे, या भोंदू बाबाला रुपाली चाकणकर यांनी गुरू मानले होते. रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातचे पाय धुतानाचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले. अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच चाकणकरांवर टीकेचेही बाण सोडले. या मागणीने इतका जोर धरला की, 20 मार्च रोजी रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. या प्रकरणात आता बिग बॉस मराठी ५ फेम छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरोडे यानं उडी घेतली आहे. त्यानं या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यानं अशोक खरातवर ताशेरे ओढले आहेत.

सोशल मीडियावर त्यानं एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत छोटा पुढारी म्हणतो, ‘नमस्कार मित्रांनो आज मला अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. मित्रांनो आपण बोलतो आज महाराष्ट्र 21 व्या शतकाच्या दिशेनं जात आहे. आधुनिक काळ सुरू होत आहे. प्रगती होत चालली आहे. पण प्रगती होत असताना तितक्याच झपाट्याने महाराष्ट्र मागे येत आहे का? हे बघितलं पाहिजे. कारण आज नागरिकांना भोंदूबाबाचं खूप वेड लागलं आहे’.’म्हणजे भोंदू बाबांनी यायचं. कानात काहीतरी थुकलं की आपण त्याचा प्रचार करायचा. प्रचार – प्रसार झालं की आपोआप गोष्टी घडतात. मग आपण आपला इतिहास विसरायचा, आपण कोणत्या पदावर आहोत, हे देखील विसरायचं. लोकांना याच्यापासून, काय मिळणार, काय आदर्श घ्यायचा, हे देखील विसरुन जायचं. तिच गोष्ट मी देखील तुम्हाला सांगतो, हा कोण कुठला भोंदू बाबा, लबाड लांडगा, नाशिकचा अशोक खरात. याचे कारनामे बघितले तर, लाज वाटते. काय कारनामे करतोय. पीडित महिलांवर त्याने बलात्कार केलं आहे. अत्याचार केलंय. त्याच्याविरोधात पुरावे, सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्याला आता अटक झाली आहे’.


‘मित्रांनो, त्याला सेलिब्रिटींनी तर साथ दिलीच, पण ज्या महिलांवर त्याने बलात्कार केला. अत्याचार केला. त्यांच्यासाठी आवाज उठवणाऱ्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या सुद्धा त्याला साथ देत होते. त्यांच्या ट्रस्टच्या अध्यक्षाही होत्या. बरं एवढंच नाही तर, त्याला गुरु मानलं. राजकारण्यांपासून समाजाला आदर्श मिळतो, पण तुम्ही समाजाला नेमकं कोणता आदर्श देताय? तुम्ही एवढ्या अंधश्रद्धाळू कधी झालात?’, असा सवाल छोटा पुढारीनं उपस्थित केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles