अहिल्यानगर निंबळक रेल्वे अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

अहिल्यानगर – एमआयडीसी जवळअसलेल्या निंबळक शिवारात रेल्वे अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना २० मार्च रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास उघडकीस आली आहे. या महिलेची ओळख पटली असून तिचे नाव संगीता नारायण शेवाळे (वय ४३, रा.वडगाव गुप्ता, ता.नगर) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

निंबळक शिवारात एका महिलेला रेल्वे गाडीची धडक बसून ती गंभीर जखमी झाल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यावर एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. खेडकर यांनी तिला तपासून उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले होते. या अहवालावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

या महिलेची ओळख सुरुवातीला पटलेली नव्हती. मात्र पोलिसांनी तिची ओळख पटविण्याचे काम सुरु केल्यावर सदर महिला ही संगीता नारायण शेवाळे (वय ४३, रा.वडगाव गुप्ता, ता.नगर) असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या पश्चात सासू, सासरे, १ विवाहित मुलगी, १ मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पतीचे ५-६ वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. मयत संगीता शेवाळे यांच्यावर वडगाव गुप्ता येथे २१ मार्च रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles