पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश

सातारा जिल्हा

परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या अभूतपूर्व राड्यानंतर विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दाखल घेतली आहे. नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पुण्याच्या विभागीय आयुक्तांना लक्ष घालून चौकशीचे आदेश दिले आहेत. आज (23 मार्च) विधानपरिषदेमध्ये सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या राड्यावरून शिवसेना नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. सभापतींनी गंभीर दखल घेत सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबनाचे आदेश दिले.

दरम्यान, नीलम गोऱ्हे यांनी निलंबनाचे आदेश देतानाच पुण्याच्या विभागीय आयुक्तांना लक्ष घालण्यास सांगितलं आहे. तसेच फुटेजही ताब्यात घेण्यास सांगितलं आहे. शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी सातारा एसपींना तत्काळ बडतर्फ करत जिल्हाधिकाऱ्यांच्या सुद्धा बदलीची मागणी केली. मंत्र्यांना मारहाण होते हे मी पहिल्यांदा ऐकत असल्याचे त्या म्हणाल्या. उसभापती नीलम गोऱ्हे यांनी निलंबनाची कारवाई केल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कडाडून विरोध केला. सभापती महोदया, तुम्ही निर्देश देण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेणं गरजेचे होतं तत्पूर्वी तुम्ही निर्देश दिले, असे म्हणत कारवाईला विरोध केला. सभापती राम शिंदे दाखल झाल्यानंतर गोरे यांनी निलंबनाला स्थगिती देण्याची मागणी केली. कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्याच काम कुणी केलं.4 हजार लोक जिल्हा परिषदेत घुसले ते कुणी आणले याच देखील उत्तर द्यायला हवं, असे गोरे म्हणाले.

गोरे म्हणाले की, सभापती महोदय तुम्ही कोणत्या प्रकारे वस्तुस्थिती जाणून न घेता एका अधिकारी निलंबित करता कसं काय? तो आयपीएस दर्जाचा अधिकारी आहे. तुम्ही असा कसा काय निर्णय घेतला. तुमच्या निर्णयावर हरकत नाही. मात्र जो निर्णय झाला आहे तो चुकीचा आहे. कार्यकर्ते कोणी आणले, भाजपवर कसं काय आरोप करता. तिथं जबरदस्ती सीइओंना बैठक कोणी घ्यायला लावली? असा सवाल केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles