कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारने दिली मोठी अपडेट

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

आठव्या वेतन आयोगाचं काम कसं सुरु?

अर्थमंत्रालयाने दिली सर्व माहिती

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लवकरच लागू होणार आहे. या वेतन आयोगाबाबत अर्थ मंत्रालयाने संसदेत माहिती दिली आहे. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, आठव्या वेतन आयोगासाठी अधिकृत काम सुरु झाले आहे. येत्या काळात पगार, भत्ते आणि पेन्शनमध्ये बदल होऊ शकतो. लोकसभेत याबाबत सरकारने माहिति दिली. आठव्या वेतन आयोगाची टाइमलाइन, काम आणि संभाव्य तारखेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

सरकारच्या मते, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना केला. या समितीच्या अध्यक्ष माजी न्यायमूर्ती रंजना प्रताश देशाई आहेत. पुलक घोष हे पार्ट टाइम सदस्य आहेत. पंकज जैन हे सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. या वेतन आयोगाच्या समितीचे काम वेतन रचना, भत्ता आणि पेन्शनबाबत शिफारसी तयार करणे आहेत.अर्थ मंत्रालयाने सांगितले की, वेतन आयोगाच्या समितीला १८ महिन्याचा वेळ दिला आहे. म्हणजेच २०२७ मध्ये शिफारसी लागू होऊ शकतात. दरम्यान, शिफारसी लागू झाल्यानंतर अंतिम निर्ण केंद्र सरकार घेणार आहे. त्यानंतरच कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार आहे.

सध्या आठव्या वेतन आयोगासाठी किती निधी लागेल, सरकारी तिजोरीवर किती ताण पडेल, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही सर्व माहिती शिफारसी लागू झाल्यानंतर समजणार आहे.

आठव्या वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांची मते लक्षात घेतली जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सूचनांसाठी ऑनलाइन पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलवर जाऊन तुम्हाला तुमचे मत मांडायचे आहे. MyGov वेबसाइटवर जाऊन माहिती द्यायची आहे. यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत अंतिम मुदत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles