अशोक खरात प्रकरणतील पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ,नगरमध्ये तिघांविरोधात गुन्हा. दोन आरोपी अटक

भोंदू बाबा खरात आरोपी असलेल्या गुन्ह्यांमधील पीडित महिलांचे व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी ३ आरोपींवर गुन्हा दाखल करून दोन आरोपी अटक करण्यात आलेली आहे. एका आरोपीचा शोध सुरू आहे.
आपल्याकडे पीडित महिलेची ओळख उघड होईल असे किंवा पीडित महिलांवर अत्याचार करत असल्याचे कोणतेही व्हिडिओ आल्यास, ते डिलिट करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अहिल्यानगर – भोंदू बाबा अशोक खरात तपास प्रकरणातील पिडीत महिला यांचे अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारीत करणाऱ्या तिघा जणांवर कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. एका आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
अशोक खरात या भोंदू बाबाबाबत सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक येथे विविध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरु आहे. असे निदर्शनास आले आहे की, या गंभीर गुन्हयातील पिडीत महिलांचे अश्लिल व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारीत करण्यात येत आहेत. कोपरगाव जि. अहिल्यानगर येथे BMW या व्हॉट्स ॲप ग्रुपवर दि. २५/०३/२०२६ रोजी राहुल गंगाधर शिंदे (अनिल कोल्ड्रींग्ज कोपरगांव) याने मोबाईलवरुन पिडीत महिलांचे अश्लिल व्हीडीओ प्रसारीत केले. त्यावरून पोलीसांनी तपास केला असता सदरचे व्हिडीओ राहुल शिंदे यास योगेश पंढरीनाथ आढाव रा. कोपरगाव, याने पाठविले असुन योगेश पंढरीनाथ आढाव यास ते व्हिडीओ त्याचा मित्र संदिप गर्जे रा. माजलगांव जि. बीड याने पाठविल्याचे तपासात समोर आलेले आले.

त्यावरून सदर आरोपी क्र.१) राहुल गंगाधर शिंदे, आरोपी क्र. २) योगेश पंढरीनाथ आढाव, आरोपी क्र.३) संदिप गर्जे या तिघां विरुध्द कोपरगाव शहर पोलीस ठाणे, अहिल्यानगर येथे गु.र.नं. १४७/२०२६ बी.एन.एस. कलम २९४ (२), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (अ) प्रमाणे गुन्हा दि. २५/०३/२०२६ रोजी दाखल करण्यात आला असुन आरोपीं. १) राहुल गंगाधर शिंदे, आरोपी क्र. २) योगेश पंढरीनाथ आढाव यांना अहिल्यानगर पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे, आरोपी क्र. ३) संदिप गर्जे याचा शोध सुरु आहे. त्यालाही लवकरात लवकर अटक करण्यात येणार आहे.

सदरचे प्रकरण संवेदनशील व गंभीर असून यामध्ये बऱ्याच महिला पिडीत असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने अतिशय संवेदनशीलरित्या व गोपनीय रित्या तिची ओळख उघड होणार नाही याची खबरदारी घेवून तपास करण्यात येत आहे.

तरी याद्वारे सर्वांना आवाहन करण्यात येते की, कोणाकडेही पिडीत महिलेची ओळख, तिच्या नातेवाईकांची ओळख, तिच्या घराची ओळख, तिच्या कूटूंबाची ओळख उघड होईल असे व्हिडीओ किंवा अश्लिल व्हिडीओ असल्यास ते तात्काळ डीलीट करावे व ते प्रसार माध्यमांवर प्रसारीत करू नये. असे व्हिडीओ प्रसारीत केल्यास संबंधितांवर व संबंधित प्रसार माध्यमाचे ग्रुपवर गुन्हा दाखल करण्यात येवुन, त्यांना अटक करून, कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन विशेष तपास पथकाने केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles