भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीचे मोठं विधान

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणात रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत असताना आता मनोरंजन क्षेत्रातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बॉलिवूडची एकेकाळची अभिनेत्री आणि आता आध्यात्मिक क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या ममता कुलकर्णीनेही खरात प्रकरणावर भाष्य केले आहे.
अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे. त्याच्या कार्यालयात लावण्यात आलेल्या छुप्या कॅमेऱ्यात त्याचे काळे धंदे कैद झाले. या लैंगिक शोषणाबद्दल ममता कुलकर्णी यांना टीव्ही ९ वृत्तवाहिनीने प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले की, खरात सारख्या माणसाने निष्पाप स्त्रियांवर खूप अत्याचार केला. मी अशा महिलांच्या पतींना आवाहन करेन की, तुम्ही आपल्या पत्नींना सांभाळा.

अभिनेत्री ममता कुलकर्णीने पुढे म्हटले की, खरातच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांनाही प्रश्न विचारायला हवा. त्या निष्पाप नक्कीच आहेत. पण त्या खरातकडे ज्योतिष पाहायला गेल्या होत्या की इतर कारणासाठी? जर त्याने मर्यादा ओलांडली होती, तर तुम्ही तिथेच त्याला लाथ मारायला हवी होती. मी हात दाखवायला आले आहे, हे करायला नाही, असे ठामपणे सांगायला हवे होते.तुमच्या अंगाला हात लावला तर तिथेच त्याला एक लावून द्यायला हवी होती. आपण मराठी आहोत. अशा भोंदूंना बळी पडायला नको, असेही अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी खडसावून सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles