केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये मोठी कपात केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १३ रुपये प्रति लिटरवरून ३ रुपये प्रति लिटर केले. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपये प्रति लिटरवरून शून्य केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होऊन सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू नयेत यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. इराण युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला होता. कच्च्या तेलाची आयात व्यवस्थित होत नसल्यामुळे देशामध्ये पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला. ही समस्या दूर करण्यासाठी आता केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली. परिणामी पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील.
इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असताना भारत सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कातप्रत्येकी १० रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.


