अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीला डांबून अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीला डांबून अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत तिला बळजबरीने कुंटणखान्याच्या व्यवसायात ओढल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही आरोपींनी तिला चुकीच्या कामासाठी प्रवृत्त केले. आरोपी याने पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याने आपल्या ताब्यातील गाडीत पीडितेला बळजबरीने बसवून एका फ्लॅटवर नेले. तिथे तिला डांबून ठेवत तिची लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या संपूर्ण प्रकरणात एका महिलेने देखील साथ दिल्याचा आरोप आहे.

​या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आणि सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत. नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ९६, ९८, ९९, ६४, १४०(४) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ​पोलीस उपनिरीक्षक गणेश गांगुर्डे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles