नगर तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकावर जमावाकडून दगडफेक; ७ पोलिस जखमी

अहिल्यानगर – शासकीय कर्तव्य बजावत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकावर दगडफेक करून कामात अडथळा आणल्याची धक्कादायक घटना नगर-सोलापूर रोडवरील तुक्कड ओढा येथे २६ मार्च रोजी रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या कालावधीत घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे नावे निष्पन्न झालेल्या ३१ जणांसह अन्य ७० जणांच्या जमावावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरु आहे.
या घटनेबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुनील रमेश मालणकर यांनी फिर्याद दिली आहे. २६ मार्च रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परिसरात गस्त घालत असताना आरोपी योगेश पंडित बेरड (वय ३४, रा.वाकोडी, ता.नगर) याने आपली मोटारसायकल आडवी लावून पोलिसांचे वाहन अडवले. त्यानंतर दिपक कुंडलिक बेरड (वय ४५),देविदास शिवाजी बेरड (४४), राजु पंडित बेरड (वय ४३), मयुर अशोक पुंड (वय ३६), धर्मा दत्तात्रय बेरड (वय ३०) यांच्या सह जमावाला बोलावून घेतले. या जमावाने पोलिसांना घेराव घातला.

जमावाने पोलिसांना अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात फिर्यादी सुनील मालणकर यांच्यासह स.पो.नि. हरीश भोये, पोलिस अंमलदार अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे आणि भगवान धुळे हे जखमी झाले असून शासकीय वाहनाचेही नुकसान झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या योगेश बेरड, दीपक बेरड, देविदास बेरड, राजू बेरड, मयूर पुंड आणि धर्मा बेरड यांच्या सह दरेवाडी येथील गणेश प्रकाश शिंदे, दिपक उर्फ खेकडा राजेंद्र बेरड, नेटके मेजर,राहुल राधाकिसन करांडे, मयुर भाऊसाहेब बेरड, भानुदास बेरड, विशाल अरुण करांडे, बाळासाहेब सुर्यभान करांडे, महादेव उर्फ महादु छबु करांडे, लहु मारुती करांडे, धनंजय अशोक करांडे, राजेंद्र बेरड, तुषार मोहन बेरड, सागर उर्फ मामु हरी बेरड, नितीन शिवाजी बेरड, भाऊसाहेब राजेंद्र बेरड, अनिल शंकर करांडे, संदीप शिवाजी करांडे, बापु करांडे, दिपक भाऊसाहेब करांडे, भाऊसाहेब करांडे, मोहन श्रीधर बेरड, सचिन अशोक बेरड, गणेश करांडे, कमलेश करांडे (सर्व रा. दरेवाडी, ता. नगर) व इतर ७० अनोळखी इसम यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ३२४(४), १२१ (१), १२६ (२), १८९ (२), १८९ (६), १२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles