प्रसिद्ध कीर्तनकाराला ट्रकने चिरडलं, शेवटच्या श्वासापर्यंत समाज प्रबोधन

कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारावर काळाने घाला घातला. वारकरी परिषदेची बैठक आटोपून दुचाकीने आपल्या गावी बारूळ येथे जातं असलेल्या ह.भ.प मधुकर महाराज बारूळकर यांना एका भरधाव हायवा ट्रकने चिरडलं. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी नांदेड शहरातील सिडको परिसरात ही दुर्देवी घटना घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे.

ह.भ.प मधुकर महाराज बारूळकर हे कंधार तालुक्यातील बारूळ येथील रहिवासी आहेत. शिवाय मराठा सेवा संघाच्या संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष देखील होते. मागील अनेक वर्षापासून संघटनेत जोमाने काम करत होते. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून अंधश्रद्धेपासून समाज दूर राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करायचे. मंगळवारी सिडको परिसरात आयोजित वारकरी परिषदेच्या बैठकीत त्यांनी हजेरी लावली होती. बैठक संपन्न झाल्यानंतर ते दुचाकीने परत बारूळ गावी जातं होते सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परिसरातील रुबी हॉटेल जवळ येताच पाठीमागून भरधाव वेगाने जातं असलेल्या हायवा ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.

ट्रकखाली चिरडल्या गेल्याने ह.भ.प मधुकर महाराज यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. लग्न गर्दीचा फायदा घेत ट्रकचालक फरार झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे. नांदेड शहरात जड वाहतुकीवर बंदी आहे. असे असताना शहरात जड वाहनाची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सिडको हडको भागात रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाची रेलचेल दिवसभर सुरूच असते. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने अनेकांना चिरडल्याच्या घटना घडल्या आहे. अशा वाहनावर कायमस्वरूपी बंधन आणावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होतं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles