नरेश अरोराची कंपनी शरद पवारांवर टिका करण्याची सूचना द्यायची…अजितदादांच्या आमदाराचा गंभीर आरोपडिझाईन बॉक्स

डिझाईन बॉक्स कंपनीसोबतचे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर राष्ट्रवादीतून आता कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांच्याविरोधात प्रतिक्रियी उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियात अरोरा यांच्या आरोप करणारी पोस्ट केली आहे. ही पोस्ट करताना त्यांनी शेवटी ‘#सुत्रधार’ म्हटले आहे.

राष्ट्रवादीतील सध्या निवडून आलेल्या आमदारांना तिकीट देऊ नये म्हणून चुकीचे सर्व्हे करून याने दादांना दिले. मात्र तेच आमदार ५० हजारांहून अधिक मतांनी निवडून आले. डिझाईन बॉक्सच्या सर्व्हेला न जुमानता अजितदादांनी तिकीट दिले. ही माहिती पक्षातील अनेक आमदारांना आहे, असे मिटकरींंनी म्हटले आहे.

पक्षातील एखादा आमदार नरेश अरोरांना भेटत नाही, ओळखत नाही किंवा नमस्कार करत नाही, या कारणांवरून त्या आमदारांविषयी चुकीची माहिती अजितदादांना अरोरा द्यायचा. सुरुवातीच्या काळात हा संघटनेत प्रामाणिकपणे काम करत असावा, असा विश्वास ठेवून अजितदादांनी काही आमदारांना झापलेही. पण नंतर संबंधित आमदारांनी अरोरांशी संबंध सुधारल्यावर त्यांचे रिपोर्ट आपोआप चांगले येऊ लागले, असा दावा मिटकरींनी केला आहे.

१०–१२ फोटोग्राफर लावणे आणि दादाना पिंक जॅकेट घालण्याचा सल्ला देणे, यापलीकडे अरोराचे कोणतेही ठोस योगदान नव्हते. अजितदादा सत्तेत होते आणि ४१ आमदार निवडून आले, हे संपूर्ण श्रेय अजितदादांनाच जाते. त्यात इतरांचे व याचे काडीचेही योगदान नव्हते. अजितदादांनी अवाजवी घोषणा कराव्यात, अशा सूचना अरोरा द्यायचा. मात्र दादांनी स्पष्ट शब्दांत नकार देत सांगितले की, “मी जे करू शकतो तेच लोकांसमोर बोलणार,” आणि त्यांनी ते काटेकोरपणे पाळले, असे मिटकरी यांनी नमूद केले आहे.

पवार साहेबांवर टीका करावी, अशा सूचना तो द्यायचा. मात्र अजितदादांनी त्या कधीही मान्य केल्या नाहीत. राष्ट्रवादीच्या जोरावर अरोराने एक विमान कंपनी स्थापन केल्याची माहिती ऐकिवात आहे. सेकंड-हँड विमान खरेदी केल्याचेही सांगितले जाते. या प्रश्नाची उत्तरे दिल्याशिवाय याने महाराष्ट्र सोडू नये, असे मिटकरी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles