Google आता नवीन अकाउंट न उघडता तुम्हाला तुमचा मुख्य Gmail ID बदलता येणार

Googleआता नवीन अकाउंट न उघडता तुम्हाला तुमचा मुख्य Gmail ID बदलता येणार आहे.

स्वतः गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका मिश्किल पोस्टद्वारे ही खूशखबर दिली आहे. पिचाई यांनी म्हटले की, “२००४ हे वर्ष नक्कीच चांगलं होतं, पण तुमची डिजिटल ओळख आजही त्याच वर्षात अडकून राहण्याची गरज नाही. आता जुने ईमेल पत्ते सोडून तुम्ही उपलब्ध असलेले कोणतेही नवीन नाव निवडू शकता.

जर तुम्ही ईमेल आयडी बदलण्याचा विचार करत असाल, तर एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. एकदा युजरनेम बदलले की, पुढचे १२ महिने (१ वर्ष) तुम्हाला ते पुन्हा बदलता येणार नाही. त्यामुळे नवीन नाव निवडताना ते विचारपूर्वक आणि स्पेलिंग तपासूनच निवडा.

कसा बदलाल तुमचा ‘बोअरिंग’
हे फिचर तुमच्या फोनमध्ये उपलब्ध झाल्यावर खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा: १. तुमच्या Google Account Settings मध्ये जा. २. ‘Personal Info’ या टॅबवर क्लिक करा. ३. खाली स्क्रोल करून ‘Email’ सेक्शनमध्ये जा आणि ‘Google Account email’ निवडा. ४. तिथे तुम्हाला ‘Change’ चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून नवीन उपलब्ध नाव सेट करा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles