पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला खूप कमी गुंतवणूक करायची आहे. या गुंतवणूकीवर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो.पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट ही एक बचत स्कीम आहे. या योजनेत अनेक नागरिकांनी गुंतवणूक केली. या योजनेतील गुंतवणूकीवर बॅकेपेक्षाही जास्त व्याजदर मिळते. या योजनेत ७.५ टक्के व्याज मिळते.
व्याजदर
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये तुम्ही वेगवेगळ्या टेन्योरसाठी गुंतवणूक करु शकतात. १ वर्ष, २ वर्ष, ३ वर्ष आणि ५ वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला एका वर्षासाठी गुंतवणूक केली तर ६.९ टक्के व्याज मिळते. २ किंवा ३ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर ७ टक्के वयाज मिळते. ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर ७.५ टक्के व्याज मिळते. या योजनेत तुमचे पैसे डबल होऊ शकतात परंतु त्यासाठी तुम्हाला ५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागेल.
वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत जर तुम्ही ५ वर्षासाठी ५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला ७.५ टक्के व्याजदर मिळते. म्हणजेच तुम्ही २,२४,९७४ रुपये गुंतवणार आहात. त्यावर व्याजदर लागू होऊन तुम्हाला मॅच्युरिटीनंतर ७,२४,९७४ रुपये मिळणार आहेत. जर तुम्ही ९.६ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला डबल रक्कम मिळणार आहे. याचाच अर्थ तुम्हाला ११४ महिन्यात डबल पैसे मिळणार आहेत.
टॅक्समध्ये सूट
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेची खास गोष्ट म्हणजे या योजनेत आयकर कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट मिळते. या योजनेत तुम्ही कमीत कमी १००० रुपये गुंतवणूक अकाउंट उघडू शकता.


