केंद्रिय मंत्रिमंडळाने १९ मार्च रोजी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता यूपीआय पेमेंट करण्यावर दुकानदारांना इन्सेटिव्ह मिळणार आहे. म्हणजेच जर कोणत्याही ग्राहकाने यूपीआयवरुन पेमेंट केले तर दुकानदाराला बोनस मिळणार आहे.त्यावर काही टक्के रक्कम ही दुकानदारांना मिळणार आहे.
केंद्रिय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. भीम यूपीआय व्यव्हारांना प्रोत्साहन देण्यासाठी १५०० कोटींच्या योजनेला मंजुरी दिली आहे. यामध्ये लहान दुकानदारांना खूप फायदा होणार आहे.
केंद्राच्या या योजनेमुळे २००० रुपयांपर्यंत व्यव्हारांवर इन्सेंटिव्ह मिळणार आहे. या योजनेत यूपीआयद्वारे व्यव्हार करणाऱ्यांवर प्रत्येक व्यव्हारासाठी ०.१५ टक्के प्रोत्साहन मिळणार आहे. ही योजना १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत राबवण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळाने मंजूर केलेली ही योजना २००० रुपयांपर्यंतच्या व्यव्हारांवर लागू असणार आहे. या योजनेत लहान दुकानदारांना प्रत्येक यूपीआय पेमेंटवर ०.१५ टक्के प्रोत्साहन मिळणार आहे. म्हणजेच जर कोणी १००० रुपयांचे पेमेंट केले तर १.५ रुपये इन्सेंटिव्ह मिळणार आहे.
याचसोबत बँकांनादेखील फायदा होणार आहे. सरकार बँकांच्या दाव्याच्या रक्कमेच्या ८० टक्के रक्कम तात्काळ देईल. उर्वरित रक्कम निकष पूर्ण झाल्यावर देईल. या योजनेमुळे बँकांसोबत उद्योजकांनाही फायदा होणार आहे. त्याचसोबत ग्राहकांनाही कॅश घेऊन जाण्याची गरज नाही.
लहान व्यवसायिकांना पूर्णपणे डिजिटल पेमेंट वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा यामगचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे लहान उद्योजकांना प्रोत्साहन मिळणार आहे.


