Video :आज्जींनी कामासाठी पाठवलं पण आजोबा रस्त्यावर वरातीत नाचू लागले ;आज्जींची एंट्री भररस्त्यात काठी घेऊन….

सोशल मीडियावर सतत काही न काही व्हायरल होत असते. कपल डान्स तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच डान्स करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. यात आता वृद्ध लोकांचाही समावेश होतोय. या व्हिडीओमध्ये आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय, याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या आजोबांचा डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही. मात्र खरी गम्मत पुढे आहे.. असं म्हणतात पुरुष कितीही कठोर असला तरी आपल्या बायकोसमोर मात्र त्याची भित्रीभागूबाई होते. व्हिडिओमध्येही आजोबांसोबत असंच काहीसं घडतं.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात आजोबा लग्नाच्या वरातीत बेधुंद होऊन गाण्यावर नाचताना दिसत आहेत. आजोबा तरुणांसोबत बेफान होऊन नाचतात पण तितक्यातच मागून त्यांच्या पत्नीची म्हणजेच आज्जींची एंट्री होते. सांगितलेलं काम सोडून आजोबा कुणाच्याही लग्नाच्या मिरवणूकीत नाचत आहेत हे पाहून आज्जी संतापतात आणि भररस्त्यात काठी घेऊन त्यांच्या मागे लागतात.आज्जींना पाहताच आजोबा घाबरतात आणि वेगाने तिथून पळू लागतात. व्हिडिओच्या शेवटी आजोबा पळून जाताना दिसतात तर आज्जीही त्यांच्या मागे काठी घेऊन पळताना दिसून येतात. आज्जी-आजोबांच्या या गमतीदार व्हिडिओने आता यूजर्सना हसू अनावर केलं आहे.

या आजोबांचे नेमके वय माहित नसले तरी ते ७० च्या आसपास असेल असा अंदाज आहे. आजोबा अगदीच मजेदार डान्स करताना दिसत आहेत.या वयातही हे इतक्या उत्साहाने करत असलेला डान्स पाहून त्यांचे कौतुक होताना दिसत आहे. चेहऱ्यावर या वयातही असलेला उत्साह आपल्यालाही एनर्जी देणारा ठरू शकतो.

 

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबात माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ memewalanews यांनी इन्स्टाग्राम अपलोड केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles