अहिल्यानगर-मनमाड वाहतुकीत मोठा बदल! पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आदेश, पर्यायी मार्ग…

राहुरी यात्रा काळात अहिल्यानगर-मनमाड वाहतुकीत मोठा बदल! पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आदेश

राहुरी पोलीस ठाणे हद्दीत आज दि. 05/04/2026 ते 09/04/2026 या कालावधीत राहुरी येथील खंडोबा देवस्थान यात्रा मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येत आहे. या कालावधीत काठी मिरवणूक, बेलगाडा कार्यक्रम, कुस्ती स्पर्धा, छबिना मिरवणूक तसेच विविध करमणुकीचे कार्यक्रम होणार असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती राहून परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वाहतुकीचे योग्य नियमन करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33(1)(ब) नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून दि. 05/04/2026 ते 09/04/2026 या कालावधीत दररोज दुपारी 3.00 ते रात्री 11.00 वाजेपर्यंत अहिल्यानगर – शिर्डी मार्गावरील अवजड वाहन वाहतूक खालील पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.

पोलीस अधीक्षकांनी दिलेली प्रमुख मार्गदर्शक तत्वे

जड/अवजड वाहतुकीवर निर्बंध

अहिल्यानगर – शिर्डी मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

पर्यायी मार्गांची सविस्तर माहिती

अहिल्यानगर → राहुरी → शिर्डी → मनमाड → मालेगाव → धुळे मार्ग
पर्यायी मार्ग:

विळद फाटा – बुऱ्हाणे चौक – शेंडी बायपास – नेवासा फाटा – कायगाव टोका – गेवराई – वैजापूर मार्गे वाहतूक वळविण्यात येईल.

मनमाड → कोपरगाव → शिर्डी → राहुरी → अहिल्यानगर मार्ग

पर्यायी मार्ग:

पुणतांबा – तळेगावदिघी – नांदूरशिंगोटे – आळेफाटा मार्गे वाहतूक वळवली जाईल.

(कमी उंचीच्या वाहनांसाठी पर्याय):

कोपरगाव – पुणतांबा / बाभळेश्वर – श्रीरामपूर – नेवासा मार्ग वापरण्याचे निर्देश.

अहिल्यानगर/राहुरी → संगमनेर → नाशिक मार्ग

पर्यायी मार्ग:

कळ्याण बायपास – आळेफाटा – संगमनेर मार्गे वाहतूक वळविण्यात येईल.

सिन्नर – लोणी मार्ग (अहिल्यानगरकडे येणारी वाहतूक)

पर्यायी मार्ग:

संगमनेर – आळेफाटा मार्गे वाहतूक वळवली जाईल.
या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन पूर्णतः सज्ज असून श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर, राहुरीचे तहसीलदार डॉ. अमित पवार तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था आणि गर्दी नियंत्रणासाठी पोलीस व महसूल प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

अत्यावश्यक सेवांना सूट

या आदेशातून रुग्णवाहिका, अग्निशमन दल, शासकीय वाहने व स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेली अत्यावश्यक सेवा व वाहने यांना सूट देण्यात आली आहे.

उल्लंघन केल्यास कारवाई

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांनी वाहतूक बदलाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अहिल्यानगर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles