भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन ; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप

भोंदू अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना बीडमधून निनावी पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याचे नाव आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. रुपाली चाकणकर यांच्या आशीर्वादाने बीडमधील महिला पदाधिकारी अशोक खरातकडे येथील महिला नेत होत्या, असा खळबळजनक दावा या पत्रात करण्यात आलाय. त्यामुळे, पुन्हा एकदा अशोक खरात प्रकरणावरुन रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे गर्भलिंग निदान याबाबत चाकणकरांकडून अशोक खरात पाठराखण केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या हेमा पिंपळे यांनी केला आहे. पिंपळे यांनी संबंधित पत्राचा दाखलाही दिला.

बीडमधील डॉक्टरांकडून लिंगनिदान केलं जात होतं. या पत्रानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी पत्राची सत्यता तपासून पोलीस अधीक्षकांनी सुमोटो दाखल करून एसआयटीकडे हे पत्र द्यावे, याची चौकशी करावी अशी मागणी केली. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा लिंगनिदान होण्यासाठी पाठबळ देत होत्या, ही गंभीर बाब असल्याचा आरोप देखील पिंपळे यांनी केला. संबंधित पत्रावरील सहीची तपासणी केली तर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येईल म्हणून त्याची सत्यता तपासण्याची मागणी केली जात आहे. अशोक खरातकडे बीडमधील महिला जात होत्या अशी चर्चा आतापर्यंत बीडमध्ये होती. परंतु, या पत्रातून त्याला उजाळा मिळाला असल्याचं पिंपळे यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, अशोक खरातप्रकरणी अद्यापही एसआयटीकडून आरोपीचा कसून तपास केला जात आहे. या तपासातून दररोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. दुसरीकडे रुपाली चाकणकर यांनाही एसआयटीने समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. तत्पूर्वी त्यांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आला असून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरुनही त्या पायउतार झाल्या आहे. त्यामुळे, त्यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, आता गर्भलिंगनिदान यास त्यांनी समर्थन दिल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर बीडमधील हेमा पिंपळे यांच्याकडून केला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles