राहुरी विधानसभा पोटनिवडणुक अक्षय कर्डिलेंचा उमेदवारी अर्ज दाखल; अक्षय कर्डिले म्हणाले, माझ्या आयुष्यातील निवडणूक…

अहिल्यानगर : भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या चिरंजीव युवा नेते अक्षय कर्डिले यांनी भाजप पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महापौर ज्योतीताई गाडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार सुरेश धस, आमदार मोनिकाताई राजळे, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, काशिनाथ लवांडे, अलकाताई कर्डिले, महेंद्र भैय्या गंधे, संदीप कर्डिले, उदयसिंह पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अक्षय कर्डिले यांनी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या आई अलकाताई कर्डिले यांनी औक्षण करून आशीर्वाद दिला. आईची गळाभेट घेताना अक्षय कर्डिले भावूक झाले असून उपस्थितांनाही हा क्षण भावनिक करून गेला. कार्यकर्त्यांनी “शिवाजीराव कर्डिले अमर राहो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
यावेळी अक्षय कर्डिले म्हणाले की, “राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वडिलांच्या जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून वडिलांनी जनतेशी जिव्हाळ्याचे, कौटुंबिक नाते निर्माण केले होते. आज ती संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली आहे. माझ्या आयुष्यातील ही पहिली निवडणूक असून वडील माझ्यासोबत नाहीत, ही सर्वात मोठी वेदना आहे. मात्र त्यांचा वारसा पुढे नेत सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी रात्रंदिवस काम करणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाने राहुरी पोटनिवडणुकीचा राजकीय माहोल चांगलाच तापला असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles