राहुरी पोटनिवडणुकीत मोठी घडामोड ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दोन एबी फॉर्म !

राहुरी पोटनिवडणुकीत मोठी घडामोड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दोन एबी फॉर्म पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आता हे दोन एबी फॉर्म का पाठवण्यात आले असा प्रश्न पडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्राजक्त तनपुरे आणि गोविंदराव मोकाटे यांना हे फॉर्म दिले आहेत.

राहुरी मतदारसंघात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांचा पराभव झाला होता. सध्याच्या पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे पक्षाने पर्यायी उमेदवार म्हणून गोविंदराव मोकाटे यांच्याकडे देखील एबी फॉर्म दिला आहे. गोविंदराव मोकाटे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि भाजप उमेदवार अक्षय कर्डिलेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.

राहुरी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादी शरद पवार गटाने दोन पर्याय तयार ठेवले आहेत. प्राजक्त तनपुरे यांनी अपक्ष लढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पक्षाने हे पाऊल उचलल्याचे दिसते. आज दुपारी २ वाजता पक्ष अधिकृत उमेदवार जाहीर करणार असल्याने, राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील इतर पक्षांनाही आपली रणनीती ठरवण्यास मदत होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles