अखेर राहुरी पोटनिवडणुकीतून प्राजक्त तनपुरे यांची माघार ;पवारांच्या राष्ट्रवादीकडून’ या’ शिलेदाराला उमेदवारी

बारामतीनंतर राहुरीची पोट निवडणूकही बिनविरोध होणार नाही, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार उतरवण्यात आला आहे. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अर्ज भरला नाही, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा राहुरीत सुरू झाली होती. पण अखेरच्या अर्ध्या तासात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुत्रे हलवली अन् स्थानिक नेते गोविंदराव मोकाटे यांनी अर्ज भरला आहे. त्यामुळे आता राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डीले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंदवार मोकाटे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.

राहुरी विधानसभा पोट निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गोविंदराव मोकाटे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. अर्ज भरण्याच्या अर्धा तास आधी महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गोविंदराव मोकाटे यांनी अर्ज दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोकाटे यांना संधी दिली आहे.

 

 

 

राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी मोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी मतदारसंघातील आवाज विधानसभेत पोहोचावा यासाठी मला शेतकर्‍यांनीच उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, असे त्यांनी म्हटले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles