नेवासा तालुक्यातील अग्नीशस्त्रासह खुनाचा प्रयत्न करुन दहशत
निर्माण करणारी टोळी हद्दपार
प्रस्तृत बातमीतील हकीगत अशी की, टोळी प्रमुख (9) शुभम विश्वास उर्फ विश्वनाथ गर्जे,वय १९ वर्षे, रा. वडुले, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर टोळी सदस्य (२) आकाश उर्फ दत्तु उर्फ दत्ताउर्फ दत्तात्रय मच्छिंद्र सावंत, वय २५ वर्षे, रा. चिलेखणवाडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर व टोळीसदस्य (३) योगेश मच्छिंद्र सावंत, वय २८ वर्षे, रा. सदर यांनी एक गुन्हेगारी टोळी तयार करुनत्यांचे टोळीचे गुन्हेगारी अस्तित्व टिकविण्यासाठी नेवासा तालुक्यातील सर्वसामान्य नागरीकांमध्येदहशत निरतंर राहण्याकरीता गैर कायदयाची मंडळी जमवुन गंभीर दुखापत करणे, अश्लील कृती करुन शिवीगाळ दमदाटी करणे, दरोडा टाकणे, अग्नीशस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे, साथीचे रोग
पसरविणे, गुंगीकारक पदार्थांची विक्री करणे, अग्नीशस्त्र व घातक शस्त्रासह गैर कायदयाची मंडळी जमवुन शिवीगाळ दमदाटी करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे असे गुन्हे सराईतपणेकेलेले असुन दिवसेंदिवस टोळीची गुंडगिरी व गुन्हेगारीवृत्ती वाढतच चालली होती.टोळी प्रमुख व टोळी सदस्यांनी सन २०१० ते सन २०२५ याकालावधी मध्ये सराईतपणे केले असुन त्यांचे विरुध्द प्रतिबंध कारवाई करुन सुध्दा त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. टोळीच्या सदर कृत्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये दहशतीचे व भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे टोळीने केलेल्या गुन्हयांबाबत कोणीही सर्वसामान्य नागरीक उघडपणे तक्रार, साक्ष अगर माहिती देण्यास पोलीस स्टेशनला येत नव्हते. सदर टोळीकडून भविष्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडणार असल्याने संपुर्ण टोळीची पांगापांग करुन हद्दपार केल्याशिवाय टोळीचे गैरकृत्यांना आळा बसणार नव्हाता तसेच नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत व आजुबाजुच्या परिसरातील सर्वसामान्य नागरीकांच्या जिवीतास व मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी व टोळीची दहशत कमी करण्यासाठी व त्यांचे गैरकृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी टोळीप्रमुख व टोळी सदस्य यांचे विरुध्द श्री. महेश पाटील, पोलीस निरीक्षक, नेवासा पोलीस स्टेशन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ नुसार अहिल्यानगर जिल्हा हद्दीतुन ०१ वर्षाकरीता हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकण यांचेकडे सादर केला होता. सदर प्रस्तावाची
श्री. निरज राजगुरु, उप विभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग, जि. अहिल्यानगर यांनी चौकशी करुन शिफारराराह अहवाल सादर केला होता. सदर प्रस्तावाची आम्ही सखोल चौकशी करुन टोळी प्रमुख (9) शुभम विश्वास उर्फ
विश्वनाथ गर्जे, वय १९ वर्षे, रा. बडुले, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर. टोळी सदस्य (२) आकाश उर्फ दत्तु उर्फ दत्ता उर्फ दत्तात्रय गछिद्र सावंत,वय १५ वर्षे, रा. चिलेखणवाडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर व टोळी सदस्य (3) योगेश मछिद्र सावंत, वय १८ वर्षे, रा. सदर यांनाअहिल्यानगर जिल्हयातुन ०३ महिन्याकरीता हयपार केले बाबतचे आदेश पारीत केले आहेत.


