कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील गुन्ह्यातील एका 16 वर्षीय अल्पवयीन अपहरण झालेल्या मुलीचा कोतवाली पोलिसांकडून शोध
अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचना व आदेशानुसार ऑपरेशन मुस्कान अभियाना अंतर्गत अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन आरोपीस केले अटक
सविस्तर माहिती अशी की कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलगी वय 16 वर्ष ही दि.09/02/2026 रोजी सायंकाळी 16:00 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी प्रकाश सावंत राहणार बोल्हेगाव MIDC अहिल्याननगर याने सदर मुलीचे अपहरण केलेबाबत मुलीच्या पालकांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 100/2026 BNS 137(2) प्रमाणे दाखल केला होता.
सदर संशयित आरोपीने सदर मुलगी हिची अपहरण करून घेऊ गेल्यानंतर त्याचा बराच शोध घेतला असता तो व अल्पवयीन मुलगी ही मिळून येत नव्हते. सदर मुलगी व आरोपी हे श्रीरामपूर शहरात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत असले बाबत. कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने त्यांनी सदर माहिती तपासी अधिकारी प्रवीण पाटील यांना कळवल्याने
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील ,महिला पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले,पोलीस कॉन्स्टेबल याकूब सय्यद, अमोल गाडे, संदीप शेंडगे यांचे पथक तयार करून श्रीरामपूर शहर येथे रवाना केले. तेथील बातमी प्रमाणे सदर पथकाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची मदत घेऊन सादर बातमीप्रमाणे बारकाईने तपास करून सदर अल्पवयीन मुलगी व आरोपी यांना ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस स्टेशन येथे घेऊन येऊन सदर आरोपी यास सदर गुन्ह्यात अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहेत.
सदर कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कुलबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग डाॅ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील महिला पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल याकूब सय्यद,अमोल गाडे, संदीप शेंडगे व दक्षिण मोबाईल सेल राहुल गुंडू यांनी केली आहे.


