अहिल्यानगर -शहरातील प्रेमदान हाडको परिसरात विद्यार्थ्यावर चार जणांनी कोयत्याने हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. यश मनोज कांडेकर (वय 21, रा. सिव्हील हाडको) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (8 एप्रिल) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल पाडळे, तुषार भोसले, नयन तांदळे, अक्षय पवार (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. नीलक्रांती चौक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यातील अमोल, नयन व अक्षय यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची (13 एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. फिर्यादी यश कांडेकर हा न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. संशयित आरोपींनी यापूर्वीही कॉलेज परिसरात येऊन यश व त्याच्या मित्रांना शिवीगाळ व दमदाटी केली होती. आम्ही इथले दादा आहोत, पुन्हा दिसलात तर हात-पाय तोडू, अशी धमकी त्यांनी दिल्याचे फिर्यादी नमूद आहे.
दरम्यान, मंगळवारी (7 एप्रिल) रात्री 10:45 वाजता यश हा त्याचा मित्र रोहन बुचकेसोबत बंटी सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेला होता. त्यावेळी संशयित आरोपी तेथे आले. त्यांनी यशला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कोयता दाखवत धमकी देत त्याच्या गळ्यातील चैन हिसकावून घेतली. तसेच आम्हाला पैसे द्यावे लागतील, नाही दिल्यास हात-पाय तोडू, अशी खंडणीची धमकी दिल्याचेही फिर्यादी म्हटले आहे. आरोपींनी कोयत्याने यश वर हल्ला केला. सलूनची काच फोडून नुकसान केले. वस्तरा आणून यशवर हल्ला


