राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप? एकनाथ शिंदेंची बुधवारी ठाकरे गटाच्या 8 खासदारांसोबत गुप्त बैठकी चर्चा

राज्यात ऑपरेशन टायगर राबवून ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी दिल्लीतील नेतृत्त्वाने एकनाथ शिंदे यांना हिरवा कंदील दिला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी शिंदे पडद्यामागे अजूनही यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यासाठी एकनाथ शिंदे  अजूनही गुप्तपणे ठाकरे गटाच्या खासदारांशी सातत्याने संपर्कात आहेत. यासंदर्भात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री ‘ऑपरेशन टायगर’च्या अनुषंगाने ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत  मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे हे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करुन महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप करणार का, ही चर्चा पुन्हा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या खासदारांना मातोश्रीवर बोलावून त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी आपण पक्षाशी इमानदार राहू, अशा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला होता. मात्र, आता या नव्या भेटीने ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पुन्हा उधाण येण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या आठ खासदारांची ही बैठक पार पडल्याचे वृत्त आहे. बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी अचानक त्यांचा ताफा सोडून वेगळ्या मार्गाने गेली. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाच्या खासदारांना भेटल्याचे वृत्त आहे. बुधवारी रात्री उशीरा सुरु झालेली ही बैठक पहाटेपर्यंत सुरु होती, अशी माहिती आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित असल्याची माहिती आहे.

आज सकाळी मला धक्का बसला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार शिंदे गटात जाणार असं छापलं आहे. अनिल देसाई यांना वगळलं गेले. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. मला उभं चिरलं तरी मातोश्रीची निष्ठा दिसेल. उद्धव साहेबांनी मला खासदार केले. आईच्या दुधाशी प्रतारणा करणार नाही. भगवा घेऊन आलो भगवा पांघरून जाणार, असे अरविंद सावंत यांनी म्हटले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles