रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या अडचणी वाढल्या, खरात प्रकरणात पोलिसांची नोटीस, धक्कादायक माहिती समोर

नाशिकचा भोंदू असलेल्या अशोक खरात याच्याविरोधात अत्याचाराची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दरम्यान त्यानंतर त्याचे एक -एक कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आतापर्यंत त्याच्यावर महिला अत्याचार आणि फसवणुकीच्या प्रकरणात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात एसआयटीची नियुक्ती करण्यात आली असून, एसआयटीकडून देखील त्याची चौकशी सुरू आहे.

या प्रकरणाता आता रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांना आज शिर्डी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. भोंदू अशोक खरात याच्या विरोधात शिर्डीमध्ये सावकारीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली होती. समता पतसंस्थेत अनेक खाती अशी आहेत, जी वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर आहेत, मात्र नॉमीनी स्वत: अशोक खरात हाच आहे. या खात्यांवरून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार करण्यात आले आहेत.

प्रतिभा चाकणकर यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या नावेही समता पतसंस्थेत चार खाती आहेत. या सर्व खातेदारांचे जबाब घेण्याचं काम सध्या सुरू आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात 33 खातेदारांनी जबाब नोंदवले आहेत. प्रतिभा चाकणकर यांनाही जबाब देण्यासाठी शिर्डीत पोलीस ठाण्यात आता हजर राहावं लागणार आहे. शिर्डी पोलीसांकडून प्रतिभा चाकणकर यांच्या दोन पत्यांवर पोस्टाने नोटीस पाठवण्यात आली आहे. पुढच्या पाच दिवसांमध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावे असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता प्रतिभा चाकणकर यांना आपला जबाब नोंदवण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर राहावं लागणार आहे. दरम्यान भोदू अशोक खरातसोबतचे फोटो समोर आल्यामुळे राज्यातील काही नेत्यांच्या देखील अडचणी वाढल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles