.‘हे’ वीज मीटर लावून ग्राहक बनले ‘स्मार्ट’, वीजबिलात १०० कोटींची बचत

दोन वर्षांपासून रडतखडत चालेल्या स्मार्ट मीटर जोडणी योजनेला गेल्या काही महिन्यात राज्यात वेग आला असून एक कोटींहून अधिक ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात यश आले आहे.

महत्वाचे म्हणजे, या मीटरमुळे अनेक वीज ग्राहकाना आपल्या बिलात स्मार्ट बचत करता आली आहे. विजेची मागणी कमी असताना स्मार्ट मीटरचा वापर केल्यास प्रति युनिट ८० ते ९० पैशांची बचत होते. महावितरणच्या या योजनेमुळे गेल्या वर्षी ग्राहकाने १०० कोटीची बचत करता आली.

महावितरणकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मागील दोन महिन्यात तब्बल २० लाखांहून अधिक ग्राहकांनी स्मार्ट मीटर जोडणी घेतली. जोडणीचा वेग कायम राहिल्यास पुढील वर्षी मार्चपर्यंत घरोघरी स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडला (महावितरण) यश येईल, असा दावा महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी लोकसत्ताशी बोलताना केला.

 

स्मार्ट मीटरचा विरोध कमी करण्याकरिता महावितरणने जुनी मीटर बदलून स्मार्ट लावण्याकरिता आकारण्यात आलेले शुल्क माफ केले. आता केवळ नवीन मीटरकरिता शुल्क आकारले जात आहे. तसेच, प्री-पेड ऐवजी पोस्ट-पेडचा पर्याय देऊ केला. शिवाय ग्राहकांना वीज बिल बचतीचे म्हणजे ‘टाइम ऑफ डे’चे (टीओडी) फायदे दिले जात आहेत. यामुळे विजेची मागणी कमी असताना वापर केल्यास दर कमी असल्याने वीज बिल दरात कपात होते. या उपाययोजनांमुळे ग्राहकांचा विरोध मावळून स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला गती आली आहे. अकोला,अमरावती विभाग मात्र कमालीचे मागे असून या ठिकाणी अवघ्या चार टक्के घरगुती,औद्योगिक व व्यापारी ग्राहकांना स्मार्ट मीटर जोडणी देण्यात यश आले आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles