पोहायला शिकवणे बेतले जीवावर वडिलांचा मृत्यू , मुलाला वाचवण्यात यश; श्रीगोंदा तालुक्यातील घटना

श्रीगोंदा -तालुक्यातील देवदैठण येथे रविवारी (दि.12) सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत 40 वर्षीय अमित रंगनाथ साठे यांचा केटीवेअरमध्ये बुडून मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या मुलाला वेळेत बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली. याबाबत अधिक माहिती अशी की, अमित साठे हे आपल्या 9 वर्षीय मुलगा साहील (इयत्ता चौथी) याला पोहायला शिकवण्यासाठी गावातील संत निमराज महाराज मंदिर व दधीची ऋषी मंदिराच्या मागील सिद्ध नदीवरील केटीमधील पाण्यामध्ये गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अमित साठे पाण्यात बुडाले.

घटनेदरम्यान साहील हाही पाण्यात बुडत होता. त्याचवेळी तेथून जात असलेल्या सुधीर धोत्रे या तरुणाने प्रसंगावधान राखत तात्काळ धाव घेतली आणि साहीलला सुरक्षित बाहेर काढले. अमित साठे यांचा नवनाथ जाधव या तरुणाने अर्धा तास शोध घेतला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. सरपंच व स्थानिक नागरिकांनी बेलवंडी पोलिसांना कळविले. त्यानंतर रायगव्हाण येथील एकलव्य संघटनेच्या बचाव पथकाने शोधमोहिम राबवून अमित साठे यांचा मृतदेह बाहेर काढला.

शोधमोहिमेत काळू निकम, करण माळी, राहुल गायकवाड, बन्नी जाधव, दादू गायकवाड यांचा सहभाग होता. तसेच दौलत नाना शितोळे यांची डिसास्टर रिस्क्यू फोर्स व रांजणगाव एमआयडीसी येथील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरूर येथे पाठविण्यात आला असून, या घटनेचा तपास बेलवंडी पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles