राजकीय वर्तुळात खळबळ… काँग्रेसला मोठा राजकीय धक्का; बड्या नेत्यानं दिला राजीनामा

काँग्रेस पक्ष चांगलाच कोंडीत सापडला आहे. एकीकडे राज्यातील सरकारमध्ये फेरबदल करण्यात यावा, मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा यासाठी ३० आमदारांनी दिल्ली गाठली आहे. दुसरीकडे दावणगेरे पोटनिवडणुकीची धामधूम असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अंतर्गत वादामुळे काँग्रेसच्या बड्या नेत्यानं राजीनामा देत रामराम ठोकला आहे. ज्येष्ठ अल्पसंख्याक नेते के. अब्दुल जब्बार यांनी पक्षाच्या राज्य शाखेच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार यांच्याकडे पाठवला आहे.

राज्यातील दावणगेरे दक्षिणमध्ये ९ एप्रिल रोजी झालेल्या पोटनिवडणुकीनंतर काही दिवसांनी कर्नाटक काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून येत असल्याचं दिसत आहे. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना उद्देशून लिहिलेल्या आपल्या राजीनामा पत्रात, जब्बार यांनी दावणगेरे पोटनिवडणुकीच्या संदर्भात अलीकडे घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्यभरातील अल्पसंख्याक नेत्यांमध्ये “तीव्र निराशा” निर्माण झाल्याचे म्हटलं.

पक्षातील सूत्रांनी असे सूचित केले आहे की, स्थानिक नेते आणि समुदाय प्रतिनिधींची अपेक्षा असूनही, दावणगेरे दक्षिणमधील एका अल्पसंख्याक उमेदवाराला तिकीट नाकारण्यात आलं, यामुळे असंतोष वाढला आहे. प्रचाराच्या काळात हा मुद्दा अधिकच वाढला असून त्यामुळे पक्षांतर्गत उघड मतभेद निर्माण झालेत. दरम्यान जब्बार यांनी आपल्या पत्रात अधोरेखित केले की, केवळ दावणगेरेमध्येच नव्हे तर संपूर्ण कर्नाटकात अल्पसंख्याक नेत्यांना बाजूला सारल्यासारखे वाटतंय. निवडणूक रणनीतीमध्ये पक्ष नेतृत्वाकडून सल्लामसलतमध्ये सहभाग करून घेतला जात आहे.

जब्बार यांनी ज्येष्ठ मंत्री बी. झेड. जमीर अहमद खान यांच्यासोबत झालेल्या सार्वजनिक वागणुकीबाबतही भाष्य केले आहे . अल्पसंख्याक व्यवहार, वक्फ आणि गृहनिर्माण मंत्र्यांना दावणगेरेमध्ये प्रचार न करण्यास अनेक वेळा ‘अपमानकारकपणे’ सांगण्यात आले, असा दावा त्यांनी केला. या घटनेमुळे अल्पसंख्याक समुदाय आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, तसेच कोणतीही शिस्तभंगाची कारवाई किंवा माफी मागण्यात आली नाही, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles