नगर – सोलापूर महामार्गावरील हॉटेल मध्ये गेलेल्या तरुणीवर हॉटेल मालकाने केला अत्याचार

नगर – सोलापूर महामार्गावरील अंबिलवाडी (ता.नगर) शिवारात असलेल्या हॉटेल तुळजा भवानी येथे एका २२ वर्षीय तरुणीवर हॉटेल मालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात हॉटेल मालक जनार्धन जाधव आणि एका अनोळखी कामगारावर अत्याचार आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ११ एप्रिल रोजी सायंकाळी एका व्यक्तीची चौकशी करण्यासाठी हॉटेलवर गेली होती. त्यावेळी तिथे असलेल्या कामगाराने तिला माहिती न देता हॉटेल मालक जनार्धन जाधव याला बोलावले. जाधव याने पीडितेशी अश्लील भाषेत बोलण्यास सुरुवात केली. महिलेने याला विरोध केला असता, आरोपी कामगाराने तिचा हात धरला आणि मालकाने तोंड दाबून तिला जबरदस्तीने हॉटेलच्या वरील मजल्यावर असलेल्या खोलीत ओढत नेले.

खोलीत नेल्यानंतर कामगाराने पीडितेची ओढाताण केली आणि तो बाहेर निघून गेला. त्यानंतर जनार्धन जाधव याने पीडितेच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. जाताना आरोपीने खोलीला बाहेरून कडी लावून तिला डांबून ठेवले. पीडितेने हिंमत दाखवून खोलीच्या दरवाजाला लाथ मारून तो उघडला आणि खाली आली. मात्र, दोन्ही आरोपींनी तिला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

‘जर कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत मारून टाकू’, अशी धमकीही त्यांनी दिली. या घटनेनंतर पीडितेने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles