onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक -13-04–2026 एकुण कांदा गोणी -38,705
लाल कांदा बाजार भाव

1 नंबर= 900 ते 1200
2 नंबर= 600 ते 900
3 नंबर= 300 ते 600

4 नंबर= 150 ते 300

————————————————————————————————————————————–

हद्दपार गुंड गावठी पिस्तूलसह जेरबंद

​अहिल्यानगर -जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या एका सराईत गुंडाला भिंगार कॅम्प पोलिसांनी बाराबाभळी शिवारात सापळा रचून अटक केली आहे. आकाश संजय पवार (वय २६, रा. ब्रम्हतळे, नागरदेवळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

​नगर-पाथर्डी रस्त्यावरील हॉटेल शौर्य समोर एक तरुण कमरेला पिस्तूल लावून संशयास्पदरीत्या फिरत असल्याची खात्रीशीर माहिती सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तपास पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वेढा टाकला. पोलिसांची चाहुल लागताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क कर्मचाऱ्यांनी त्यास जागीच पकडले. झडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदेशीर शस्त्रसाठा मिळून आला.

​चौकशीत धक्कादायक बाब समोर आली की, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी आरोपी पवार याला १६ एप्रिल २०२४ पासून दोन वर्षांसाठी संपूर्ण जिल्ह्यातून हद्दपार केले होते. असे असतानाही त्याने आदेशाचे उल्लंघन करून शहरात प्रवेश केला आणि शस्त्र बाळगले. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्म, पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदीश मुलगीर, योगेश पवार, विलास गारुडकर, रामनाथ डोळे व प्रमोद लहारे यांच्या पथकाने केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles